आमच्या बद्द्ल

वाटचाल आत्तापर्यंत

इतिहास

करवीर संस्थापिका छ.महाराणी ताराराणीच्या गादीचा वसा आणि वारसा लाभलेली आणि छ.शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिरोळ नगरी स्वांतत्र लढ्यात “करवीरची बार्डोली” म्हणून शिरोळ गावास ऐतिहासिक परंपरा व पार्श्वभूमी निर्माण केली. दे.भ.माधवराव बागल, पद्मश्री रत्नाप्पांना कुंभार आदि नेत्यांच्या नेतृत्वाखाली तसेच दिनकरराव देसाई, रावबा मिणचे, भाई दिनकरराव यादव, गणपतराव धर्माधिकारी, यशवंतराव जगदाळे. शी.रा.पाटील, बाळकृष्ण सुतार, भु.दा.मिणचे, फत्तेसिंह पाटील, आनंदराव कदम यांच्या सारख्या थोर विभूतीच्या कतृत्वाने संपन्न झाली आहे.

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात श्री.बुवाफन महाराज व हजरत नुरखाना बादशहा यांचा ऊरूस प्रसिध्द आहे. श्री.बुवाफन महाराज हे शिरोळचे ग्रामदैवत. दरवर्षी येथील उरुसा निमित्त धार्मिक,अध्यात्मिक,कला, क्रीडा,सांस्कृतिक,शेती,साहित्तीक प्रदर्शने परंपरा जोपासली जात आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर , छ.शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज ,स्वांतत्र क्रांती मशाल ज्योत स्तंभ जैन धर्मियांचा नमो:कार मंत्र स्तंभ आणि भारताचे संविधान असलेला स्तंभ असे दर्शन घडते ते पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारात.

छ. शिवाजी महाराज्याच्या काळातील जयभवानी तोफेच्या सलामीने शिरोळ दसऱ्याच्या उत्सवात विशेष महत्व आहे. तोफेच्या सलामीमुळे वेगळीच रंग व शान प्राप्त होते. उगवत्या पिढी समोर दसरा काळातील तोफ गर्जना हा एक दुर्मिळ पण ऐतिहासिक परंपरेचा वारसा जिवंत राहिलेला आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री.दत्त मंदिरातील “दत्त गुरु भोजन पात्र” व पवित्र पाषण शिळे वरील श्री.दत्त महाराज्यांच्या बोटांच्या खुणा हा चमत्कार फक्त शिरोळ नगरीतच पहावयास मिळतो.

दत्त मंदिरा बरोबरच संत शिरोमणी समर्थ रामदास स्वामीच्या हस्ते स्थापन करणेत आलेले पुरातन हनुमान मंदिर व धनगरी ढोल व ओव्यांच्या स्पर्धाच्या बहुचर्चित कार्यक्रम तो यां शिरोळ नगरीच्या बिरदेव मंदिरात होतो. गावातील इतर देवी देवतांची मंदिरे हि शिरोळच्या धार्मिक व अध्यात्मिक परंपरेचे प्रतिक आहे.

तसेच शाहू महाराजांच्या काळात गावाच्या पाण्यासाठी उत्तरेस बांधण्यात आलेला कल्लेश्वर तलावाच्या नयनरम्य मनमोहक सौंदर्याने शिरोळ करांची कलात्मकता आजही खुलत आहे,तर नागरिकांची साहित्यिक बुद्धिमत्ता प्रगल्भ व्हावी म्हणून छ.शाहुराजांच्या नावाने सव्वाशे वर्षापूर्वी स्थापन झालेल्या राजश्री शाहू नगर वाचन मंदिरामध्ये दुर्मिळ व सुसज्ज ग्रंथालय जिल्ह्यात अग्रस्थानी आहे.

शिरोळ भूमी खऱ्या अर्थाने सुजलाम्‌ व सुखसंपन्न झाली. ती पंचगंगा नदीच्या प्रवाहाने. जाणता राजा राजश्री शाहू महाराजांच्या विचारातून साकारलेल्या या नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे शिरोळ वाशीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच पण जिरायत जमिनी बागायती होवून पंचक्रोशिचा चेहरामोहराच बदलून गेला.

शिरोळात सध्या अनेक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, दवाखाने, दळणवळनाच्या सोयी निर्माण झाल्या.

१)   रचना

शिरोळ हे गाव पंचगंगा नदीच्या तीरावरती वसलेले असून कोल्हापूर पासून शिरोळचे अंतर ४३ की.मी. इतके आहे. व १९६१ ला शिरोळ ला तालुक्याचे स्थान प्राप्त झाले.व पंचायत समितीची स्थापना झाली.

)भौगोलिक परिस्थिती

   शिरोळला एकूण २६१४.५२ हे.क्षेत्र प्राप्त आहे.त्याचा सविस्तर आढाव पुढीलप्रमाणे

सिंचनाखालील क्षेत्र : २४०४.४६ हे.

सिंचनाखाली नसलेले क्षेत्र : २१०.०६ हे.

जंगल : नाही

भौगोलिक  क्षेत्र : २६१४.५२ हे.

३) लोकसंख्या

शिरोळची एकूण लोकसंख्या हि २७६४९ इतकी  ­(२०११ च्या जनगणनेनुसार) आहे.

पुरुष :१४२१६     स्त्री : १३४३३

SC : ३७५४            ST : १५४६         इतर : १५४६

४) शेती व पिके

गावाला सुपीक मोठ्या प्रमाणात  जमीन लाभलेली आहे. शिरोळ मध्ये एकूण २४०४.४६ हे.जमीन शेतीसाठी वापरली जाते. बहुसंख्य लोक हे शेती करतात व ऊस हे प्रमुख पिक आहे.त्याबरोबर गहू, भाजीपाला,सोयाबीन व इतर उप पिके याचेही उत्पादन केले जाते.शेतीच्या पाण्यासाठी पंचगंगा नदीचा मोठा स्रोत आहे. तसेच विहिरी व पाईप लाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो.गावात अनेक शेती अवजारे व औषधाची दुकाने उपलब्ध आहेत.शेतीसाठी आधुनिक अवजाराचा वापर करून शेती पद्धती सुधारण्यात आलेली आहे.

५) भाषा

शिरोळ मध्ये मुख्यता मराठी भाषा वापरली जाते,तसेच   व्यसायाकरिता आलेल्या गुजरात व राजस्थान मधून आलेले परप्रांतीय देखील आपली भाषा बोलतात.

६) सामाजिक एकता :

शिरोळ गावामध्ये अनेक जातीचे व धर्माचे लोक राहतात.गावात मराठा,मुस्लीम,जैन,लिंगायत,चर्मकार,बार्बर, हिंदु मऱ्हार,मागासवर्गीय समाज व इतर धर्माचे लोक आहेत.व गावात सामाजिक एकता आहे.

७) यात्रा व प्रार्थनास्थळे

                 शिरोळ मध्ये सामाजिक एकता आहे.गावात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत.दिवाळी नतंर येणाऱ्या पौर्णिमेला गावात ग्रामदैवत श्री.बुवाफन महाराज याचा मोठा ऊरूस भरला जातो.तसेच राममंदिर ,विठ्ठलमंदिर,हनुमानमंदिर,मशिद,असे अनेक प्रार्थनास्थळे आहेत.

८)पाणीपुरवठा

शिरोळ मध्ये कृष्णा नदी द्वारे पिण्याचे पाणी  याची सोय केली आहे. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करनेसाठी  पाण्याच्या ३ टाकी बसवणेत आले आहेत.

अ)पिण्याचे पाणी :

गावातील लोकांसाठी पिण्याचे पाण्याची सोय हि पाण्याच्या टाकी द्वारे केली जाते.गावात सध्या ३ पाण्याचा टाक्या कार्यरत आहे. व ग्रामपंचायत मार्फत २००७-२००८ या कालावधीत ग्रामआरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती शिरोळ या योजनेंतर्गत सुधारित शिरोळ नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली व योजनेद्वारे शिरोळ गावाला शुध्द पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावात हातपंप ६० आहेत व त्याचा वापर घरगुती वापरासाठी करतात.

ब)सांडपाणी योजना :

गावात सांड पाण्याचा निचरा होणेसाठी गटारी बाधण्यात आलेल्या आहेत,व ते पाणी शोष खड्डे बांधून त्या द्वारे पाण्याचा निचरा केला जातो.

९)आरोग्य सेवा :

गावात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी खाजगी व सरकारी दवाखाने उपलब्ध आहेत. गावात १ ग्रामीण रुग्णालय व ४१ खाजगी दवाखाने आहेत, आरोग्याच्या दृष्टीने या दवाखान्यातून योग्य सुविधा पुरविल्या जातात.

१०) बँक पतसंस्था व सोसायटी :

गावातील लोकाच्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा यासाठी गावात बँका,पतसंस्था व सोसायटी यांची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे नागरिकांना पैशाची ठेवी ठेवता याव्यात व गरज पडल्यास कर्जाची हि सोय उपलब्ध होते . गावात एकूण ७ बँका, ७ पतसंस्था व ६ सोसायटी आहेत.

११) दळणवळण     

शिरोळ मध्ये पूर्वी पारंपारिक पद्धतीने वाहतूक व दळणवळण केले जायचे.बैलगाडी,टांगा,पायी,अशा प्रकारे प्रवास केला जात असे.परंतु काळाबरोबर सुधारणा होत गेल्या व दळणवळनाच्या सोयी सुधारत गेल्या.सध्या शिरोळ मध्ये बस स्थानक आहे,तसेच खाजगी वाहनाचा हि वापर वाढला आहे.बस सेवा मुळे लोकांचा प्रवास सुखाचा व सोयीचा झाला आहे.तसेच शिरोळ पासून १० की.मि.अंतरावर जयसिंगपूर येथे रेल्वे स्थानक आहे.

आधुनिक काळाबरोबर दळणवळनाच्या सोयी सुधारत व प्रगत होत गेल्या आहेत.

१२) विद्युत पुरवठा

           शिरोळ मध्ये विजेचा वापर हा मोठया प्रमाणात केला जातो. शिरोळ मध्ये एकूण ४८२८ कुटुंबे आहेत व प्रत्येक घरात विद्युत सोयी पुरविल्या जातात.गावात एकूण ९९० स्ट्रीट लाईट चे डांब आहेत. तसेच विजेची बचत करणेसाठी सौर उर्जेवर आधारित ६ सौर पथदिवे आहेत.

१३)उद्योगधंदे 

शिरोळ गावात वेगवेगळे लहान मोठे उद्योगधंदे आहेत.त्यानुसार गावात दुग्धव्यवसाय,केशकर्तनालय असे अनेक उद्योग आहेत.

त्याचबरोबर चाळीस वर्षापूर्वी स्थापन झालेला श्री.दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हे शिरोळ चे वैशिष्ट आहे.या कारखान्यामुळे अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.तसेच शिरोळ पासून जवळ असलेल्या औदयोगीक वसाहतीमुळे अनके बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले.

१४) डेअरी संस्था

     शिरोळ मधील दुग्धव्यवसाय हा एक महत्वाचा व्यवसाय आहे.व त्यानुसार गावात वेगवेगळे दुग्ध डेअरी संस्था आहेत. गावात एकूण ६ दुध डेअरी आहेत.

१५) साक्षरता

शिरोळ गावामध्ये साक्षरतेचे प्रमाण हे

पुरुष : ४०.३१%     स्त्री : ३१.३५%  आहे. शिरोळ मधील साक्षरतेचे प्रमाण वाढणेसाठी गावामध्ये शाळा, महाविद्यालय,हायस्कूल आहेत.

१६) रोजगार

श्री.दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व शिरोळ पासून जवळ असलेल्या औदयोगीक वसाहतीमुळे अनके बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले.

१७) तरूण मंडळे

गावात अनेक सामाजिक,सांस्कृतिक मंडळे आहेत.ह्या मंडळामार्फत  दहीहंडी,गणेशोत्सव,नवरात्र असे उत्सव तसेच रुक्षारोपण, रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी असे अनेक कार्ये पार पडली जातात.

गोकुळाष्टमी वेळी गावातील अनेक मंडळे हे दहीहंडी फोडनेसाठी जातात,गावातही दहीहंडी आयोजित केलेली असते.

गणेशोत्सव हा देखील शिरोळ मधील महत्वाचा उत्सव आहे.यावेळी गावात खूप धूमधाम असते. हि मंडळे समाज प्रबोधन करणारे व धार्मिक सजीव देखावे साजरे करतात उदा.लेक वाचवा, दुष्काळ चा बळी,स्वामी सर्मथ चरित्र अशा प्रकारे देखावे दाखवले जातात.व गणपती बाप्पाची विसर्जनावेळी भव्य मिरवणूक काढली जाते.

१८) महिला बचत गट

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. शिरोळात एकूण १५३ आहेत. त्याद्वारे महिलांना बचतकरण्याची सवय लागली व कुटुबाच्या उदरनिर्वाहात महिलाचा हातभार लागला. तसेच रोजगार उपलब्ध झाले. ह्या गटामार्फत पापड लोणचे उद्योग,महिला जागृती असे कार्यक्रम राबविण्यात आले.

१९) सन 

गावात प्रत्येक सन मोठ्या आनंदात साजरा केला जातो.दिवाळी,दसरा,ईद,ख्रिसमस,बौद्ध जयंती,बेंदूर,शिवजयंती असे सगळे सन मोठ्या उत्सवात साजरे केले जातात.

दसऱ्या वेळी गावात पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ मध्ये ५ तोफेची सलामी दिली जाते. शिरोळचे हे महत्वाचे एैतिहासिक वैशिष्ट आहे.

 
 

२०) शिक्षण

शिरोळ मध्ये गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने ३६ अंगणवाडी,१४ प्राथमिक शाळा,५ हायस्कूल व २०१०-११ या वर्षी श्री दत्त पाँलीटेक्निक महाविद्यालय याची स्थापना करण्यात आली आहे.

अंगणवाडी मध्ये मुलांचा शिक्षणाचा पाया घातला जातो,त्यांना पोषण आहार,आरोग्य सेवा पुरविल्या जातात. प्राथमिक शाळा  मधून मुलांचा शिक्षणाचा पाया मजबूत केला जातो.व पुढे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण दिले जात.या विद्यालयात शिक्षणाबरोबर विविध सांस्कृतिक,क्रीडा,कला,या स्पर्धा घेतल्या जातात,व मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयन्त केला जातो.

काळानुसार शिरोळमधील शिक्षणाचा दर्जा उंचावत जात आहे.

२१) विविध योजना

                गावात ग्रामपंचायती मार्फत विवध योजना राबविल्या जातात.उदा.प्रधानमंत्री घरकुल, रमाई घरकुल, शबरी घरकुल योजना ,महात्मा गांधी रोजगार हमी योजना,पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना,यशवंत पंचायत राज अभियान,निर्मल ग्राम योजना,दलित वस्ती सुधारणा योजना,लेक वाचवा अभियान.

 
 

सन २००७-२००८ ला शिरोळ ग्रामपंचायतीला निर्मलग्राम  पुरस्कार मिळाला आहे.

२२) पक्ष

शिरोळचे राजकीय पक्ष हे शिरोळच्या वैशिष्ट्यात भर पडतात.शिरोळ मध्ये काँग्रेस,राष्ट्वादी काँग्रेस,शिवसेना,छ.ताराराणी विकास आघाडी व स्वा.शे.संघटना हे महत्वाचे पक्ष आहेत.

दलित मित्र कै.दिनकरराव यादव यांच्यानंतर मा.आमदार डाँ.सारे पाटील हे आमदार झाले. मा.आमदार डाँ.सारे पाटीलसो यांनी काँग्रेस पक्षातुन आमदार होवून “काँग्रेस का हात आम आदमी के साथ” या म्हणी प्रमाणे शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविला.

तसेच स्वा.शे.संघटनेचे अध्यक्ष मा.खासदार राजू शेट्टीसो यांनी ऊस व दुध आंदोलनातून शेतकऱ्यांना दराच्या बाबतीत न्याय मिळवून दिला,त्याचे श्रेय म्हणून जनतेने  त्यांना प्रथम आमदार व नंतर खासदार केले.या पदाचा योग्य तो वापर शिरोळ तालुक्यातील जनतेला व शेतकऱ्यांना विविध योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी केला.

शेवटी असे म्हणता येईल की पक्ष कोणताही असला तरी,तो जनतेसोबत सदैव राहतो हे महत्वाचे.