विशेष प्रयत्न

१. शिरोळ गाव हे गुटखा व प्लास्टिक मुक्त आहे.
२. गावातील दारिद्र्य रेषेखालील बेघर लाभार्थीना व मागासवर्गातील लाभार्थीना इंदिरा आवास घरकुल बांधून देणे विषयी प्रयत्न करून दरवर्षीचा कोटा पूर्ण केला आहे.
३. गाव १०० टक्के हागणदारी मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले आहे.
४. महात्मा गांधी तंटामुक्त गाव म्हणून २०१५/१६ ला पूरसाकार मिळाला आहे.
५. दर महिन्याच्या मासिक भेटीवेळी गावातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा मध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवल्याबद्दल सत्कार केला जातो.
६. गाव स्वच्छ व सुंदर होण्यासाठी गावात ठीक ठिकाणी वृक्ष रोपण करण्यात आले आहे.
७. एकाच छताखाली शिरोळ मधील ग्रामस्थांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अपंगासाठी योजने अंतर्गत २५०० ग्रामस्थांनी सहभाग घेतला त्यापैकी ६०० लाभार्थी पात्र, २५४ लाभार्थ्यांना शासनाचे अनुदान पेन्शन स्वरूपात मिळत आहे.
८. ४५०० जणांना राजीव गांधी योजनेचे कार्ड मोफत वाटप करण्यात आले आहे.
९. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पुरुष मयत झालेनंतर विशेष साहाय्य योहानेतून १२ कुटुंबाना प्रत्येकी १२ हजार रुपये वाटप.
१०. हृदय रोग तपासणी शिबीर – २१४ जणांची तपासणी करण्यात आली त्यापैकी १२ जनाची मोफत शास्त्र क्रिया करण्यात आली .
११. पंचगंगा प्रदूषण मुक्त होण्यासाठी काही उपक्रम हाती घेऊन, गणेश विसर्जनाच्या वेळी निमाला व मूर्ती नदीमध्ये विसर्जन न करण्याचा उपक्रम केला.
१२. शिरोळ गाव १०० % कुपोषण मुक्त होण्यासाठी ग्रामपणाच्यात व लोक वर्गणीतून मुले दत्तक उपक्रम राबवून कुपोषण मुक्त केले.
१३. एकात्मिक बालविसकस मधून २ अंगणवाडी बांधली आहे.

prayatna shirol